महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मोठे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. वेदान्त फॉक्सकॉन, टाटा एअरबस प्रकल्प, बल्क ड्रग पार्क असे अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानं विरोधी पक्षाने शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं होतं. यानंतर आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संबंधित उद्योग महाराष्ट्राबाहेर कसे गेले, याची सविस्तर माहिती देणारी श्वेतपत्रिका जारी केली आहे. यावर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. ही श्वेत पत्रिका म्हणजे शिंदे सरकारच्या नाकर्तेपणाचा पुरावा आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकाशित केलेल्या श्वेतपत्रिकेवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “खोके सरकारच्या नाकर्तेपणाची आणि उद्योग जगताचा सध्याच्या सरकारवर अजिबात विश्वास नसण्याची साक्ष देणारी ‘श्वेतपत्रिका’ आज प्रकाशित झाली. महाराष्ट्राबाहेर गेलेले चार मेगा प्रकल्प हा या श्वेतपत्रिकेचा विषय होता. मविआ सरकारच्या काळात जे उद्योग व प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी अंतिम टप्प्यावरची चर्चा करत होते. पण हे प्रकल्प महाराष्ट्रात बेकायदेशीर खोके सरकार येताच आणि त्यांच्या नेतृत्वाला भेटताच महाराष्ट्रातून तळ हलवून बाहेर गेले. श्वेतपत्रिका हा याचा ढळढळीत पुरावा आहे.”

Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
raj thackeray criticized sharad pawar
“शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, राज ठाकरेंची सडकून टीका; रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य, म्हणाले…
Priya Sarvankar on Amit Thackeray
‘त्या’ युवराजाला जनता कंटाळली, आता हा ‘राज’पुत्र काय करणार?, सदा सरवणकरांच्या मुलीची दोन्ही ठाकरेंवर जोरदार टीका

आदित्य ठाकरे ट्वीटमध्ये पुढे म्हणाले की, श्वेतपत्रिकेतील बहुतेक तारखांमधून काही खणखणीत सत्य समोर येत आहेत:

  • मिंधे-भाजपाचा महाराष्ट्राविषयीचा द्वेष आणि खोके सरकार स्थापन झाल्यावर उद्योग कसे दुसऱ्या राज्यात पाठवले गेले.
  • गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रताप केल्याने सद्य परिस्थितीवर उद्योग जगताचा महाराष्ट्रावर अजिबात विश्वास उरलेला नाही.
  • राज्यात दुर्दैवाने एक पूर्णपणे अकार्यक्षम बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. ज्यांनी उद्योजकांच्या भेटींनंतर स्वहस्ते उद्योगधंदे राज्याबाहेर ढकलून दिले.
  • श्वेतपत्रिकेत वेदान्त-फॉक्सकॉन, एअरबस-टाटा, बल्क ड्रग पार्क, सेफ्रॉन उद्योगांचा उल्लेख आहे. मात्र महाराष्ट्रापासून दूर ढकललेल्या इतर उद्योगांचा उल्लेख करण्यात आलेला नाही –

“वैद्यकीय उपकरण पार्क (Medical Device Park), सौर ऊर्जा उपकरणे पार्क (Solar Energy Equipment Park) आणि बल्क ड्रग पार्क बद्दलच्या उल्लेखावरून हे सिद्ध होतंय की, मोठ्या प्रमाणात औषध उत्पादनासाठी महाराष्ट्र सर्वोत्तम पर्याय असूनही हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. सर्वच्या सर्व ३ पार्क नाही, तरी किमान १ पार्क तरी महाराष्ट्राला मिळायलाच हवे होते,” असं आदित्य ठाकरेंनी नमूद केलं.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “हा अहवाल महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता की राज्याला एक नाकर्ता मुख्यमंत्री आणि माहितीशून्य उद्योगमंत्री आहे, हे सिद्ध करण्यासाठीच प्रकाशित केला? असा प्रश्न मला पडतोय. त्यांनी अधिकृतपणे मांडलेला रेकॉर्ड पाहता, दोघांनाही महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या मंत्रिमंडळात स्थानच मिळणार नाही. तसेच, खोके सरकारने सांगितल्याप्रमाणे ‘वेदान्त फॉक्सकॉन’ प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, त्या प्रकल्पाचा ह्या श्वेतपत्रिकेत उल्लेखही नाही.”