किरीट सोमय्या आणि संजय राऊत असा उभा राजकीय सामना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे कुटुंबीय यांच्यावर गंभीर आरोप केले असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील थेट शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. या पत्रकार परिषदेत राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याभरातून राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना आता शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर सूचक विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“२०२४मध्ये केंद्रातून निधी येईल”

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज कल्याण-डोंबिवलीमध्ये विविध उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी “२०२४मध्ये केंद्रात देखील महाविकास आघाडीचंच सरकार येईल”, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, “२०२४मध्ये राज्यासाठी केंद्रातून मोठ्या प्रमाणावर निधी येईल”, असं देखील आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

“…याचा अर्थ वेट अँड वॉच”, संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सूचक प्रतिक्रिया!

दरम्यान, यावेळी माध्यम प्रतिनिधींनी किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातील कलगीतुऱ्याविषयी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारले. विशेषत: संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेविषयी विचारणा करताच आदित्य ठाकरेंनी क्रिकेट सामन्याच्या शैलीत उत्तर दिलं. “संजय राऊतांनी काल मॅच सुरू केली आहे. आता पुढची बॅटिंग बघू”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

“बाळासाहेबांनी ‘ती’ गोष्ट मला सांगितली असती, तर आज तुम्ही नसता”, नारायण राणेंचं संजय राऊतांवर टीकास्त्र!

आदित्य ठाकरेंनी दखल घ्यावी – संजय राऊत

संजय राऊतांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपावर आणि विशेषत: किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत. “नील किरीट सोमय्या यांची ‘निकॉन इन्फ्रा कन्सट्रक्शन’ ही कंपनी असून वसईतील गोखिवरे येथे मोठा प्रकल्प राबवत असून त्यांचाही पीएमसी बँक घोटाळ्यातील राकेश वाधवानशी संबंध आहे. देवेंद्र लाडानीच्या नावे सोमय्यांनी ४०० कोटी रुपयांची जमीन ४.५ कोटी रुपयांना घेतली. तसेच वाधवान याच्याकडून १०० कोटी रुपये वसूल केले. सोमय्यांच्या प्रकल्पांना पर्यावरण विभागाची परवानगी नाही, असा आरोप करत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची दखल घ्यावी, अशी मागणी राऊत यांनी केली. यावेळी किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना अटक करावी”, असं राऊत यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray reacts on sanjay raut allegations on kirit somaiya bjp pmw