ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर टीका केली आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा झाला त्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी यह डर अच्छा है म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हटलंय आदित्य ठाकरेंनी?

महाराष्ट्रातलं सरकार घटनाबाह्य आहे. ६ हजार कोटींचा रस्ते घोटाळा झाला आहे याप्रकरणी मी लोकायुक्तांकडे जाणार आहे. स्ट्रीट फर्निचर घोटाळाही झाला आहे. त्याबाबतही लोकायुक्तांकडे जाणार आहोत. मुख्यमंत्री टेंडर शोधत असतात आणि सरकारमध्ये अनेकांना फॉरेन ट्रिप करायला आवडतं. यांना वाटतं की सुट्टी लागली आहे. मी प्रश्न विचारला होता की तुम्ही परदेशात जाऊन काय करणार? हा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ३० मिनिटात दौरा रद्द केला. यह डर अच्छा है. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली.

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा परदेश दौरा नेमका कशासाठी आहे त्यांनी सांगावं. तुम्हाला कुठे जायचं आहे तिथे जा मात्र जनतेच्या पैशांचा अपव्यय करु नका. उदय सामंत यांचा तिसरा परदेश दौरा आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्सला जात आहात. कुणाला भेटणार? कोणत्या कंपन्या येणार? याबाबत काहीच भूमिका स्पष्ट केलेला नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला आहे.

वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत का?

छत्रपती शिवरायांची वाघनखं आणणार असं सरकारकडून सांगण्यात येतं आहे. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर वाघनखांविषयी माहिती घेतली. त्यात म्हटलं आहे की वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरली नाहीत. ही वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत का? हे सांगा असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.