महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून शेवटच्या काही दिवसांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी मतदारसंघांमध्ये प्रचारसभांचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चर्चेत आला आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी मोठी मदत केल्याचं श्रेय घेतलं जात असताना दुसरीकडे विरोधकांकडून त्यावरून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. आज सकाळी शरद पवारांनी या योजनेवरून सरकारवर टीका केली असताना आदित्य ठाकरेंनीही योजनेवर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

लोकसत्ताच्या लोकसंवाद कार्यक्रमात आदित्य ठाकरेंची सविस्तर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांवर आदित्य ठाकरेंनी सविस्तर उत्तरं दिली. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत विचारणा केली असता त्यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.

Sharad Pawar on Vote Jihad: ‘पुण्यात विशिष्ट समाजाचे लोक भाजपाला मतदान करतात’, व्होट जिहादवरून शरद पवारांचा फडणवीसांना टोला
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
Chhagan Bhujbal On Manoj Jarange
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटलांची एंट्री, येवलेकरांनी केले जंगी स्वागत
ajit pawar baramati assembly election
Ajit Pawar: “मी पेताड, गंजेडी असतो तर ठीक आहे, पण…”, अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Nagpur, Narendra Modi, Narendra Modi marathi news,
मोदी विदर्भात येऊन नागपूरला येणे का टाळतात ? लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही प्रचिती

“आम्ही योजनेला विरोध केला नव्हता. पण आम्ही सांगितलं होतं वाढीव निधी द्या. यांना बहिणी कधी दिसायला लागल्या? जेव्हा हे दिसायला लागलं की हे महाराष्ट्रात बेकार हारणार आहेत. दुसरं म्हणजे १५०० रुपये हे देत आहेत. त्यात काही भागणार आहे का? आता सांगतायत आम्ही २१०० रुपये देऊ. मग आधीच २१०० रुपये का दिले नाहीत? तुम्ही एकीकडे अदाणीला ५० हजार कोटींची सूट देऊ शकता, तुम्ही कंत्राटदारांना वाढीव पैसे देऊ शकता, मग लाडक्या बहि‍णींना जास्त पैसे देऊ शकत नाही?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी महायुतीला केला आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

“जो खर्च तुम्ही होर्डिंग आणि बॅनरवर केला, तो खर्च वाढवून द्या ना? आम्ही तर सांगतोय आम्ही ३ हजार रुपये देऊ. पण भाजपा, अजित पवार किंवा एकनाथ शिंदे सांगतायत ते ३ हजार रुपये देऊ शकत नाहीत. तुम्ही देऊ शकत नाहीत पण आम्ही देणार आहोत. हा फरक आहे”, असंही ते म्हणाले.

महिलांच्या सन्मानाचं काय?

दरम्यान, लाडकी बहीण योजना राबवताना महिला सन्मानाकडेही सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यायला हवं होतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. “लाडकी बहीणसोबत तुम्हाला महिलांचा सन्मान राखावा लागेल. एकीकडे गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांना एकनाथ शिंदे स्वत:च्या पक्षात घेतायत. दुसरीकडे वामन म्हात्रेंसारखी व्यक्ती महिला पत्रकाराला विचारते की तुझा बलात्कार झालाय का? कोल्हापूरचे महाडिक सांगतायत फोटो काढून पाठवा. ही कुठली दादागिरी आहे? तुमचे स्वत:चे पैसे आहेत का हे? करदात्यांचे पैसे आहेत. जर तुम्ही अदाणींना फुकट गोष्टी देऊ शकता, तर लाडक्या बहिणीलाही देऊच शकता”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.