Aaditya Thackeray Over Mumbai : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असून आता कर्नाटकातील आमदाराने थेट मुंबईला लक्ष्य केलं आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, अशी मागणी आमदार लक्ष्मण सवदी यांनी कर्नाटकातील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात आता पडसाद उमटू लागले असून युवा आमदार आदित्य ठाकरेंनीही टीका केली आहे. त्यांनी थेट काँग्रेसला इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लक्ष्मण सवदी नेमकं काय म्हणाले?

आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले, “महाराष्ट्रातील बुद्धिभ्रष्ट झालेल्या एका नेत्याने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा असं वक्तव्य केलंय. यासंदर्भात माध्यमांनी आम्हाला प्रश्न विचारले. त्यावेळी संबंधित नेत्यांची मती भ्रष्ट झाल्याचं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. कर्नाटकचा अविभाज्य अंग असलेला बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करायचा असेल तर मुंबई देखील केंद्रशासित करावी अशी आम्ही मागणी केली पाहिजे.”

ते पुढे म्हणाले, आमचे पूर्वज मुंबईत वास्तव्यास होते. त्यामुळे आमचाही मुंबईवर अधिकार आहे, असं आम्ही म्हणू शकतो. कारण पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात होते. त्याठिकाणी वास्तव्य करत होते. त्यामुळे आमचाही मुंबईवर हक्क आहे. म्हणून प्रथम मुंबई केंद्रशासित केली जावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असं लक्ष्मण सवदी म्हणाले.

हेही वाचा >> Karnataka : “मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा”, कर्नाटकच्या आमदाराची विधानसभेत मागणी; म्हणाले, “आमचे पूर्वज…”

आदित्य ठाकरेंचा काँग्रेसला इशारा

“मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह आहे. काँग्रेस असो वा भाजप… कोणताही पक्ष असो… मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजिबात खपवून घेणार नाही. मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवला आहे. मुंबई आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी काँग्रेसला इशारा दिला आहे.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वीही लक्ष्मण सवदी यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली होती. तेव्हाही महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता पुन्हा त्यांनी नव्याने वादाला तोंड फोडलं आहे.

c