सक्षम जनलोकपालच्या मुद्यावरून पुन्हा उपोषणास बसलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीतील आंदोलनात गुरुवारी आम आदमी पार्टीने स्वत:ला चमकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे आंदोलनस्थळी नाराजीचा सूर उमटत असून अण्णांचे समर्थक विश्वंभर चौधरी यांनी आपला राग जाहीरपणे प्रकट केला. तर अण्णांची भेट घ्यायला आलेले ‘आप’चे कुमार विश्वास यांना एका तरुणाने धक्काबुक्की केल्याने टीम अण्णा आणि टीम केजरीवाल यांच्यातील दरी अधिक रूंदावली आहे.
दोन दिवसांपासून अण्णा हजारे राळेगणसिद्धीमध्ये उपोषणास बसले असून ‘उद्या आपण अण्णांना भेटण्यासाठी जाऊ’ असे ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी म्हटले होते. मात्र, ऐनवेळी केजरीवाल यांनी ‘आजारी’ असल्याचे सांगत ही भेट रद्द केली. यामागे अण्णा व केजरीवाल यांच्यातील मतभेद कारण असल्याची चर्चा सुरू असतानाच विश्वास यांना धक्काबुक्की झाली.
विश्वास व त्यांचे सहकारी राळेगणसिद्घीत आल्यानंतर मुंबईतील नितीन चव्हाण या तरुणाने आम आदमी पार्टी मुर्दाबाद, अण्णा हजारे जिंदाबाद अशा घोषणा देत विश्वास यांना धक्काबुक्कीच केली. ते पाहून विश्वास यांच्या कार्यकर्त्यांनीही नितीनला धक्काबुक्की केली. पोलिसांनीच त्यात मध्यस्थी करून त्याला बसस्थानकापर्यंत पाठवले. तेथूनही त्यास राळेगणसिद्घीबाहेर पाठवून देण्यात आले.
विश्वास तसेच त्यांचे सहकारी संजय सिंह व गोपाल रॉय हे दुपारी एक वाजता राळेगणसिद्घीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी हजारे यांच्याशी बंद खोलीत सुमारे पंचवीस मिनिटे चर्चा केली. आम आदमी पार्टीच्या मुंबईतील कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांना मात्र या वेळी खोलीत प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्या संतप्त झाल्या होत्या.
अण्णांच्या आंदोलनाला ‘आप’चा ताप!
सक्षम जनलोकपालच्या मुद्यावरून पुन्हा उपोषणास बसलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीतील आंदोलनात गुरुवारी आम आदमी पार्टीने स्वत:ला चमकवण्याचा प्रयत्न केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-12-2013 at 02:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam aadmi party workers participate in anna hazare fast