आम आदमी पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून रघुनाथदादा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आता रघुनाथदादा पाटील यांचे आव्हान असणार आहे.
बारामती मतदारसंघातून पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळेंविरोधात माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांना उमेदवारी दिली आहे. राज्यातील पक्षाच्या उमेदवारांची ही तिसरी यादी आहे. आम आदमी पक्षाने बुधवारी महाराष्ट्रसोबतच मध्य प्रदेश आणि बिहारमधील उमेदवारांची यादी जाहीर केले.
मतदारसंघ आणि आपचे उमेदवार पुढीलप्रमाणे
बारामती – सुरेश खोपडे
हातकणंगले – रघुनाथदादा पाटील
भिवंडी – जलालुद्दीन अन्सारी
बुलडाणा – सुधीर सुर्वे
माढा – सविता शिंदे
उत्तर मुंबई – सतीश जैन
उस्मानाबाद – विक्रम साळवे
परभणी – सलमा कुलकर्णी
कल्याण – नरेश ठाकूर
शिर्डी – नितीन उडमाले
रामटेक – प्रताप गोस्वामी
रायगड – संजय अपरांती
हातकणंगलेमधून रघुनाथदादा पाटलांना ‘आप’ची उमेदवारी
आम आदमी पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली.
![हातकणंगलेमधून रघुनाथदादा पाटलांना ‘आप’ची उमेदवारी](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/03/aap_cap1.jpg?w=1024)
First published on: 12-03-2014 at 04:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap declared third list of its candidates in maharashtra