आम आदमी पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून रघुनाथदादा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आता रघुनाथदादा पाटील यांचे आव्हान असणार आहे.
बारामती मतदारसंघातून पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळेंविरोधात माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांना उमेदवारी दिली आहे. राज्यातील पक्षाच्या उमेदवारांची ही तिसरी यादी आहे. आम आदमी पक्षाने बुधवारी महाराष्ट्रसोबतच मध्य प्रदेश आणि बिहारमधील उमेदवारांची यादी जाहीर केले.
मतदारसंघ आणि आपचे उमेदवार पुढीलप्रमाणे
बारामती – सुरेश खोपडे
हातकणंगले – रघुनाथदादा पाटील
भिवंडी – जलालुद्दीन अन्सारी
बुलडाणा – सुधीर सुर्वे
माढा – सविता शिंदे
उत्तर मुंबई – सतीश जैन
उस्मानाबाद – विक्रम साळवे
परभणी – सलमा कुलकर्णी
कल्याण – नरेश ठाकूर
शिर्डी – नितीन उडमाले
रामटेक – प्रताप गोस्वामी
रायगड – संजय अपरांती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा