सातारा लोकसभेची जागा बिनविरोध करण्याच्या हालचाली आणि त्या अनुषंगाने संबंधितांशी फिक्सिंग झाल्याची खात्री पटल्यानेच मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठीच सक्षम उमेदवार म्हणून आपण निवडणूक रिंगणात असल्याचे आम आदमी पक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र चोरगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
चोरगे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, काँग्रेस आघाडीविरुद्ध तगडा उमेदवार रिंगणात असणे लोकहिताचे होते. म्हणूनच आपली उमेदवारी आहे. राजकीय उदासिनतेमुळे जिल्ह्याचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही. सध्या जनतेमध्ये नाराजीची प्रचंड लाट असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकाने शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची वाताहत केली आहे. या पाश्र्वभूमीवर विद्यमान खासदारांच्या विरोधात महायुतीकडून तगडा उमेदवार उभा करण्यात येईल, अशी सर्वाची अपेक्षा होती. मात्र, तसे न होता, येथील जनतेशी ओळख नसलेल्या उमेदवाराला महायुतीची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आपण स्वत: या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (दि. २५) आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी ‘आप’ चे तालुका संयोजक अॅड. संदीप चव्हाण, शहर संयोजक डॉ. मधुकर माने यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा