दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने १३४ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. विजयानंतर आपच्या आप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व साखर वाटून जल्लोष साजरा केला.
हेही वाचा- विश्लेषण: दिल्लीत ‘आप’चे ‘डबल इंजिन’! दिल्ली महापालिका निकालाचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम?
दिल्ली महापालिकेच्या निवडणुका गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित होत्या. भाजपाने निवडणुकीत अनेक क्लृप्त्या वापरल्या होत्या. तरीही दिल्लीच्या मतदारांनी भाजपच्या सत्तेला धक्का देवून ‘आप’ला बहुमत दिले. कोल्हापूर महापालिकेत देखील आम्ही ताकदीने उतरणार असून दिल्ली विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज आहोत, असे ‘आप’चे प्रदेश प्रवक्ते, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी बुधवारी सांगितले.