किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार यावेळी सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकत्रे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांना देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पत्रकार परीषदेत केली.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मृत्यर्थ गेल्या सतरा वर्षांपासून सहकार, शिक्षण आणि सामाजाच्या उन्नतीसाठी रचनात्मक, संस्थात्मक कार्य करणाऱ्या, राष्ट्रीय विचारधारा जोपासणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रुपये एक लाख रोख, सन्मानपत्र, असे या पुरस्कारचे स्वरूप आहे. यापूर्वी प्रा ग. प्र. प्रधान, बाळासाहेब भारदे, भाऊसाहेब थोरात, मधुकरराव चौधरी, क्रातिवीर नागनाथ नायकवडी, पी. डी. पाटील, डॉ अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील, डॉ निर्मलाताई देशपांडे, बाळासाहेब विखे-पाटील, प्राचार्य पी. बी. पाटील, प्रतापराव भोसले, कल्लाप्पा आवाडे आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रा. वसंतराव जगताप, प्र.संभाजीराव पाटील, अनिल जोशी, प्रा.रमेश डुबल, प. ना. पोतदार, बाबुराव िशदे यांच्या निवड समितीने १८ व्या पुरस्कारासाठी डॉ पंतगराव कदम यांच्या नावाची एकमताने केलेली शिफारस संचालक मंडळाने स्वीकारली असेही मदन भोसले यांनी सांगितले. किसन वीर यांच्या १०९ व्या जयंतीदिनी दि १७ ऑगस्टला ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब िशदे यांच्या हस्ते, माजी मंत्री ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व ज्येष्ठ पत्रकार सुरेश व्दादशीवार यांच्या विशेष उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
भारती विद्यापीठाच्या स्थापनेपासून शिक्षणातून समाजपरिवर्तनाबरोबरच, सोनहीरा सहकारी उद्योग समूहाचे संस्थापक, महसूल-शिक्षण- सहकार- मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून तसेच अत्यंत प्रतिकुल परिस्थितून मार्ग काढत नवीन पिढीला निश्चित स्वरूपाची प्रेरणा देणाऱ्या पतंगराव कदम यांची निवड केल्याचे निवड समितीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी निवड समिती सदस्याबरोबरच कारखान्याचे उपाघ्यक्ष गजानन बाबर, संचालक बाबासाहेब कदम, सी. व्ही उर्फ चंद्रकांत काळे अॅड्. प्रभाकर घाग्रे, हनुमंतराव पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 5th Aug 2014 रोजी प्रकाशित
पतंगराव कदम यांना आबासाहेब वीर पुरस्कार
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार यावेळी सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकत्रे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांना देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पत्रकार परीषदेत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-08-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abasaheb veer award to patangrao kadam