मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार असलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईसहीत राज्यातील अनेक भागांमध्ये आंदोलनं केली जात असतानाच या प्रकरणासंदर्भात सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. सदानंद सुळे यांनी ट्वीटर हॅण्डलवरुन सत्तार सुप्रिया सुळेंना शिवीगाळ करताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. सदानंद सुळेंचं ट्वीटर अकाऊंट व्हेरिफाइड नसलं तरी ज्या खात्यावर ट्वीट करण्यात आलं आहे ते खुद्द सुप्रिया सुळे फॉलो करतात. सदानंद सुळे यांनी विद्यमान कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या विधानाचा दाखलाही सत्तार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा