शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवी दिली आहे. सत्तार यांच्या शिवराळ भाषेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तर राज्यभरात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या विधानावर स्पष्टीकरण देताना सत्तार यांनी पुन्हा एकदा शिवराळ भाषेचा वापर केला आहे. ज्यांना खोक्यांची आठवण येत आहे, त्यांच्यासाठी मी सिल्लोडला एक दवाखाना उभारतो. या दवाखान्यात खोक्यांची आठवण येणाऱ्या नेत्यांची डोकी तपासू. त्यांचे (सुप्रिया सुळे) पतीदेव उद्योगपती आहेत. मग त्यांना (सुप्रिया सुळे) उद्योगतीचा दर्जा द्यायचा का, असे सत्तार म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> संतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral

“विरोधक आम्हाला खोके म्हणत आहेत. याच कारणामुळे त्यांची डोके तपासावी लागतील. ज्यांना खोक्यांची आठवण येत असेल त्यांच्यासाठी मी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. ज्यांना खोक्यांची आठवण येत आहे, त्यांची डोके येथे तपासली जातील. हे भिकारचोट लोक आहेत. स्वत: भिकारचोट आहेत,” असे सत्तार म्हणाले.

“राजकारण हाच भिकारी धंदा आहे. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतांचे भिक मागतात. मग मतांची भिक मागणारे ते भिकारी नाहियेत का? त्यांचे (सुप्रिया सुळे) पतीदेव एक उद्योगपती आहेत. मग त्यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का?” असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> WS Quota Verdict : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! १० टक्के आर्थिक आरक्षणावर शिक्कामोर्तब

दरम्यान, सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत असे विधान केल्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. सत्तार यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच सत्तार यांनी २४ तासांत आपले शब्द मागे घ्यावेत, असा अल्टिमेटम राष्ट्रवादीने दिला आहे.

हेही वाचा >>>अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: “सत्तेची मस्ती जिरवणार, धडा शिकवल्याशिवाय…”; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्र्या

सत्तार नेमकं काय म्हणाले ?

औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही खोके देऊ,” असे उत्तर सत्तार यांनी दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar again basude supriya sule said shall i call her industrialist prd
Show comments