शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. सत्तार यांच्या याच भाषेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा. तसेच सत्तार यांनी आपले शब्द मागे घेत जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. राज्यभरातून टीका केला जात असताना सत्तार यांनी आता आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी महिलांचा नेहमीच सन्मान करतो. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मनं दुखली असतील तर, मी जरूर खेद व्यक्त करेन. परंतु मी असे काहीही बोललेलो नाही, असे सत्तार म्हणाले आहेत. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> राज्यभरातील टीकेनंतर अब्दुल सत्तार यांची पुन्हा शिवराळ भाषा, सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना म्हणाले “मग त्यांना…”
“मी कोणत्याही महिलेबाबत अपशब्द काढलेले नाहीत. जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबद्दल मी बोललो होते. सुप्रिया सुळे यांचे तसेच कोणत्याही महिलेचे मन दुखेल असा कोणताही शब्द मी बोललेलो नाही. मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मनं दुखली असतील तर, मी जरूर खेद व्यक्त करेन. परंतु मी असे काहीही बोललेलो नाही,” असे सत्तार म्हणाले.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा >>> संतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral
“मी फक्त खोक्यांबद्दल बोललो. मात्र माझ्या या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. माझ्या वक्तव्याचा संबंध महिलांशी जोडला जात आहे. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. यापुढेही बोलणार नाही. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तसेच सर्व आमदार महिलांचा सन्मान करतात. मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे,” असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: “सत्तेची मस्ती जिरवणार, धडा शिकवल्याशिवाय…”; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, सत्तार यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे. तसेच सत्तार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावरदेखील दगडफेक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.