अकोला शहरातील औद्योगिक वसाहतीतील कृषी खत कंपनीवर कृषी विभागाच्या कथित पथकाकडून छापा टाकण्यात आल्याचा प्रकार मोठ्या वादात सापडला आहे. छापा टाकणाऱ्या पथकामध्ये कृषिमंत्र्यांच्या स्वीय सहायकासह काही खासगी व्यक्ती असल्याचा आरोप केला जात आहे. या पथकाने दमदाटी करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसांकडे देण्यात आली आहे. याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सारवासारव करीत माझ्या सांगण्यावरूनच छापे टाकण्यात आल्याचं स्पष्ट केलं होत.
छापेारी करणाऱ्या पथकात असलेला दीपक गवळी हा आपला स्वीय सहायक नसल्याची प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी १० जूनला अकोल्यात दिली होती. पंरतु, या घटनेच्या २० दिवस आधी त्यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय दौऱ्यात गवळीचा उल्लेख ‘स्वीय सहायक’ असा करण्यात आला होता. खरंतर कृषी विभागाच्या कथित पथकानं अकोला शहरातील एमआयडीसीमध्ये धाडी टाकल्या होत्या. मात्र, अनेक खासगी व्यक्तींचा समावेश असल्याची बाब समोर आली होती. यात दीपक गवळीचाही समावेश होता आणि तोच दीपक गवळी अब्दुल सत्रात यांचा स्वीय सहाय्यक असल्याचा दावा करत अब्दुल सत्तारांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत.
या प्रकरणावर आता अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं आहे. सत्तार म्हणाले, दीपक गवळी हा कृषी अधिकारी आहे. तो या पथकामध्ये समाविष्ट आहे. कृषी विभागातील ६२ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. मे महिन्यापासून या पथकाने ८६ कारवाया केल्या आहेत. तसेच आतापर्यंत या पथकाने एकूण २६९ कारवाया केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून ६२ अधिकाऱ्यांचा समावेश या पथकात केला होता. त्यात दीपक गवळीही होते. काही शासकीय दौऱ्यात त्यांचा पीए असा उल्लेख झाला आहे.
हे ही वाचा >> आळंदी : “नियोजनाच्या नावाखाली मंदिरात…”, वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्यावरून रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
अब्दुल सत्तार म्हणाले की, बोगस औषधे, बियाणे आणि खतं तयार करणारे आणि बाळगणाऱ्याने ती ताबोडतोब नष्ट करावी. अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल