राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून जोरदार चर्चा सुरू आहे. तर काही ठिकाणी मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांना माथ्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारल्यानंतर सत्तार म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्रीच काय, त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत असं मला वाटतं.
अब्दुल सत्तार म्हणाले की, “मी हनुमान असतो तर छाती फाडून दाखवलं असतं की माझ्या हृदयात विखे पाटील आहेत.” राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री व्हावेत असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल पत्रकारांनी सत्तार यांना केल्यानंतर सत्तार म्हणले, “आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे यांनी विखे पाटलांना महसूल खातं दिलं आहे. विखे पाटील त्यात चांगलं काम करत आहेत.”
हे ही वाचा >> “छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवताय, त्यात महाराजांची भूमिका कोण साकारणार?” राज ठाकरे म्हणाले…
सत्तार म्हणाले की, “महसूल खात्याची महत्त्वाची जबाबदारी विखे पाटील सांभाळत आहेत. या विभागात अत्याधुनिक बदल होत आहेत. मी इतक्या दिवसांपासून राजकारणात आहे. मी हे नवे बदल पाहतोय.” तसेच सत्तार यांनी विखे पाटलांच्या मुख्यमंत्री पदावरदेखील भाष्य केलं. सत्तार म्हणाले, कोणाला वाटणार नाही आपला मित्र काहीतरी व्हावा. मी तर म्हणतो मुख्यमंत्रीपदापेक्षा त्यांनी पुढे जावं. तसेच ते अडचणीत येतील असे कोणतेही प्रश्न तुम्ही विचारू नका.