मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच अयोध्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांनी अयोध्येत एक मोठी घोषणा केली होती. प्रभू श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी अयोध्या येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली होती. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सकारात्मक भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, अयोध्येतला महाराष्ट्र भवनाला दुसऱ्या-तिसऱ्या कोणाचंही नाव देऊ नका. त्या भवनाला आपल्या राज्याचे पालक, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी अभिनेता अभिजीत बिचुकले याने केली आहे. अभिजीत बिचुकले म्हणाला की, अयोध्येत जाणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांच्या व्यवस्थेसाठी तिथे आपलं राज्य सरकार एक भवन बांधतंय. परंतु त्याला नाव देताना कोणाचंही नाव देऊ नये.

हे ही वाचा >> अतिक अहमदच्या हत्येच्या निषेधाचे महाराष्ट्रात झळकले बॅनर, केला ‘शहीद’ असा उल्लेख

बिचुकले म्हणाला की, अयोध्येतील महाराष्ट्र भवनला केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव द्यावं अशी माझी ठाम भूमिका आहे. यासाठी माझी मागणी मी लावून धरणार आहे. एरवी तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी माझ्या शिवाजी राजांचा उपयोग करता. मग आता महाराष्ट्र भवनला महाराजांचं नाव द्वावं.