एका कार्यक्रमात बोलताना मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांवर टीका करताना अभिनेते अभिजीत बिचुकले यांच्या नावाचा उल्लेख केला होता. सेक्रेड गेम्समध्ये जसं नवाजुद्दीन सिद्धीकीला जसं वाटतं की ‘आपणच देव आहोत’, तसंच संजय राऊतांना वाटतं. इतका आत्मविश्वास महाराष्ट्रात दोनच व्यक्तीकडे आहे. एक म्हणजे संजय राऊत आणि दुसरे म्हणजे अभिजीत बिचुकले, असे ते म्हणाले होते. दरम्यान, यावरून अभिजीत बिचुकले यांनी गजानन काळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘डाव्होसमध्ये सामंजस्य करार झालेल्या कंपन्या महाराष्ट्रातील आहेत का?’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधकांना… ”

काय म्हणाले अभिजीत बिचुकले?

“राज ठाकरे आमचे बंधू आहेत. मला त्यांना सांगायचं आहे, की त्यांचा जो पदाधिकारी आहे, गजानन काळे त्याला आज मी गांजा काळे असं नाव देतो. संपूर्ण महाराष्ट्राने हे लक्षात ठेवावं. संजय राऊतांचे आणि तुमचं काय वैर असेल ते असेल. पण तो मला गांजा ओढतो बोलला. गजानन काळेच्या ७०० पिढ्यांना अभिजीत बिचुकलेची औकात माहिती आहे का? अभिजीत बिचुकलेची जात, धर्म महाराष्ट्राच्या नावात आहे”, असं प्रत्युत्तर अभिजीत बिचुकले यांनी गजानन काळे यांना दिलं. पुढे बोलताना राज ठाकरे माझे भाऊ आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – पुण्यात कोयता गँगकडून पुन्हा दहशत; मार्केट यार्डात अल्पवयीन मुलांनी हातगाड्या, दुचाकी फोडल्या

गजानन काळे नेमकं काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी मनसेच्या एका कार्यक्रमात बोलताना मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांवर टीका करताना अभिनेते अभिजीत बिचुकले यांच्या नावाचा उल्लेख केला होता. “संजय राऊत सकाळी सकाळी कडक गांजा मारून असतात. सेक्रेड गेम्समधला नवाजुद्दीन सिद्धीकीला जसं वाटतं की आपणच देव आहोत, तसंच संजय राऊतांना वाटतं. इतका आत्मविश्वास महाराष्ट्रात दोनच व्यक्तीकडे आहे. एक म्हणजे संजय राऊत आणि दुसरे म्हणजे अभिजीत बिचुकले”, असे ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhijeet bichukale replied to gajanan kale on weed statement spb