बिगबॉस फेम अभिनेता अभिजीत बिचुकलेने अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील लूकबाबत मोठं विधान केलं आहे. “शाहरुख खानचा पठाण चित्रपटातील लूक माझ्यासारखा आहे. कारण मी बिगबॉसमध्ये असताना शाहरुख खान बिगबॉस पाहत होता,” असा दावा अभिजीत बिचुकलेने केला. तो मंगळवारी (२७ डिसेंबर) साताऱ्यात माध्यमांशी बोलत होता.
अभिजित बिचुकले म्हणाला, “कोणीतरी ट्वीट केलं आणि ती बातमी प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यात म्हटलं आहे की शाहरुख खानचा पठाणमधील लूक माझ्यासारखा दिसतो. ही एक सकारात्मक गोष्ट म्हटली पाहिजे. माझी बिग बॉसमधील हेअरस्टाईल होती. १९९१ मध्ये मी लहान होतो तेव्हा संजूबाबा म्हणजे संजय दत्तचे लांब केस होते. मात्र, आता २२ वर्षांनी जी स्टाईल आणली गेली ती माझी.”
“शाहरूख खान बिग बॉस बघत होता”
“मला वाटतं शाहरूख खान बिग बॉस बघत होता. सिझन नंबर १५ मध्ये मी काय करिष्मा केला, ‘मैंने क्या गुल खिलाए’ हे शाहरूखनेही पाहिलं आहे. लोकांनीही ते पाहिलं आहे. त्यामुळे ही लांब केसांची स्टाईल माझ्यामुळे ट्रेंडमध्ये आली असावी,” असं मत अभिजीत बिचुकलेने व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“शाहरुख खानचा पठाणमधील लूक माझ्यासारखा दिसतो”
अभिजीत बिचुकले पुढे म्हणाला, “शाहरुख खानचा पठाणमधील लूक माझ्यासारखा दिसतो. माझी बिग बॉसमधील हेअरस्टाईल तशी होती. मला वाटतं शाहरूख खान बिग बॉस बघत होता. त्यामुळे ही लांब केसांची स्टाईल माझ्यामुळे ट्रेंडमध्ये आली असावी.”
हेही वाचा : “अरे! हा तर…” ‘झुमे जो पठाण’ पाहून नेटकऱ्यांनी शाहरुख खानची केली थेट अभिजीत बिचुकलेशी तुलना, जाणून घ्या कारण
“सलमान खानचंही माझ्यावर प्रेम आहे”
“सलमान खान आणि मी एका इंडस्ट्रीत आहोत. फिल्म इंडस्ट्री असेल किंवा राजकारण असेल इथं कोणी कोणाचा शत्रू असतो असं मला वाटत नाही. त्या त्यावेळी ते घडून गेलेलं असतं. राहिला विषय आज सलमान खानचा वाढदिवस आहे याचा, तर ते नेहमीप्रमाणे साजरा करत आहेत. त्या माणसाचंही माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे माणूस म्हणून त्याला माझ्या शुभेच्छा आहेच,” असंही अभिजीत बिचुकलेने नमूद केलं.