राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं? याप्रकरणी निवडणूक आयोगासमोर आज ( २४ नोव्हेंबर ) सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “शरद पवार अध्यक्ष होण्यासाठी अजित पवार गटाचं समर्थन होतं,” असं अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “१९९९ ते २०१८ पर्यंत २० वर्षाच्या कार्यकाळात पक्षावर, शरद पवारांवर किंवा निवडणुकीबद्दल कुठलेही आरोप-प्रत्यारोप करण्यात आले नाहीत. पण, २०१८, २०२१ आणि २०२२ साली पक्षात झालेल्या निवडणुका चुकीच्या असल्याचा आरोप २०२३ मध्ये करण्यात आला. अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून हे आरोप करण्यात येत आहेत. मात्र, प्रफुल्ल पटेल यांच्या सहीनेच राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आली होती.”

हेही वाचा : “असाही तर्क लावला जाऊ शकतो की…”, EC तील सुनावणी संपल्यानंतर सुनील तटकरेंचं मोठं विधान!

“पक्ष चिन्हाबाबत पहिल्यापासूनच वाद-विवाद पाहिजे होता”

“शरद पवारांना अध्यक्षपदासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि अन्य लोकांनी पाठिंबा दर्शवला. मग, ३० जून २०२३ ला पक्षात फूट पडण्याचा प्रश्नच येत नाही. कारण, पक्ष चिन्हाबाबत पहिल्यापासूनच वाद-विवाद पाहिजे होता. ३० जूनपूर्वी अजित पवार गटाच्या वक्तव्यांमध्ये किंवा कागदपत्रात राष्ट्रवादीत फूट पडली, पक्षात गटबाजी आहे किंवा शरद पवार नेते नसल्याचा कुठेही उल्लेख नाही.”

हेही वाचा : “दादा, दादा, दादा करत आयुष्य गेलं, मग…”, सुनील तटकरेंचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

“शरद पवार अध्यक्ष होण्यासाठी अजित पवार गटाचं समर्थन होतं, पण…”

“३० जूनला याचिका दाखल केली, तेव्हा पक्षात कुठलाच वाद नव्हता. मग, पक्ष फुटीबाबत प्रश्न कुठं येतो? तसेच, निवडणूक आयोग अनुच्छेद १५ अंतर्गत कारवाई कशी करू शकते? कुठलाही वाद नव्हता, तर याचिका निवडणूक आयोगात याचिका दाखल कशी करण्यात आली? शरद पवार अध्यक्ष होण्यासाठी अजित पवार गटाचं समर्थन होतं. पण, आम्ही खोट्याला प्रतिवाद करत आहोत,” असं सिंघवी यांनी सांगितलं.