काही दिवसांपूर्वीच टोमॅटोला उत्पादन खर्च निघेल इतकाही दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकलेले पहायला मिळाले. त्यानंतर आता टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ झाली. यानंतर केंद्र सरकारने टोमॅटोचे दर नियंत्रित करण्यासाठी निर्णय घेतला. यावर अखिल भारतीय किसान सभेने तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार शेतकरीविरोधी असल्याचा गंभीर आरोप केला.

किसान सभेने म्हटलं, “ग्राहकांना स्वस्तात टोमॅटो मिळावेत यासाठी केंद्रातील भाजपा सरकारने नाफेडद्वारे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटकातून टोमॅटो खरेदी करून सरकारच्यावतीने ग्राहकांना स्वस्त दरात विकण्याचा निर्णय जाहीर केला. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपले टोमॅटो मातीमोल किमतीत विकावे लागले होते. टोमॅटो तोडण्याचा व वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी टोमॅटो अक्षरशः रस्त्याच्या कडेला फेकून देत होते.”

Vinod Tawde On Rahul Gandhi :
Vinod Tawde : “तुम्ही स्वतः या अन्…”, पैसे वाटपाच्या आरोपावरून राहुल गांधींच्या ट्वीटला विनोद तावडेंचं प्रत्युत्तर
Vinod Tawde Cash Case :
Vinod Tawde : “पैशासंदर्भातील सर्व बातम्या खोट्या”, पैसे…
BJP Leader Vinod Tawde Money Distribution Allegations by BVA leader Hitendra Thakur (2)
Video: ‘विवांता हॉटेल’मध्ये नेमकं काय घडलं? विनोद तावडेंवरील आरोपांनंतर भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची पत्रकार परिषद!
Maharashtra Exit Poll Result Date Time in Marathi
Maharashtra Exit Poll Result Date Time : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल्स कधी येणार? वेळ काय? तारीख कुठली?
BJP Leader Vinod Tawde Money Distribution Allegations by BVA leader Hitendra Thakur
Vinod Tawde : विवांता हॉटेलमध्ये किती रक्कम सापडली? काय कारवाई झाली? पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुलेंनी दिली ‘ही’ माहिती
Rahul Gandhi On Vinod Tawde
Rahul Gandhi : “विनोद तावडेंना अटक करा”, पैसे वाटप प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींनी मोदींना केला ‘हा’ सवाल
BJP Leader Vinod Tawde Money Distribution Allegations by BVA leader Hitendra Thakur
Vinod Tawde : आरोप-प्रत्यारोपानंतर हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीतून का गेले? ठाकूरांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले, “पोलिसांनी…”
Uddhav Thackeray On Vinod Tawde:
Uddhav Thackeray : “भाजपाचा हा नोट जिहाद, बाटेंगे और जितेंगे…”, विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Anil Deshmukh injured after attack on car in Nagpur
Anil Deshmukh Attack : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अनिल देशमुखांचा सत्ताधाऱ्यांना इशारा; म्हणाले, “मी…”

“शेतकरी अडचणीत असताना सरकारला मदतीची इच्छा झाली नाही”

“शेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा झाली नाही. आता मात्र मूठभर शेतकऱ्यांना दोन रुपये मिळू लागताच सरकार लगेच भाव पाडण्यासाठी सक्रिय झाले आहे. भाजपा सरकारचा हा निर्णय अत्यंत एकतर्फी व शेतकरीविरोधी आहे,” असा आरोप किसान सभेने केला. तसेच केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाला एकतर्फी म्हणत त्याचा तीव्र शब्दात धिक्कार केला.

“शहरी वोट बँक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा सातत्याने बळी”

किसान सभेने पुढे म्हटलं, “केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार सातत्याने शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे. आपली शहरी वोट बँक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा सातत्याने बळी दिला जात आहे. आपल्या संकुचित राजकारणासाठी भाजपाच्या राज्य व केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणांचा परिणाम म्हणून राज्यात सर्वच शेतीमालाचे भाव कोसळले आहेत. शेतकऱ्यांना आपला कांदा ७०० ते ८०० रुपये क्विंटल दराने विकावा लागला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा यासह सर्वच शेतीमालाचे भाव हस्तक्षेप करून पाडण्यात आले.”

“दुधाचे खरेदी दर एक महिन्यात ८ रुपयांनी पाडले”

“राज्यातील खासगी व सहकारी दूध संघ आणि कंपन्यांनी दुधाचे खरेदी दर एक महिन्यात ८ रुपयांनी पाडले आहेत. दुधाला ३५ रुपये दर देण्याच्या सरकारच्या निर्देशाला कंपन्यांनी कचऱ्याची पेटी दाखवूनही सरकार तेथे मात्र मूग गिळून गप्प बसले आहे,” असा आरोप किसान सभेने केला.

हेही वाचा : राज्यात अजूनही पेरणीयोग्य पाऊस नाही

“सरकारने आपला शेतकरीविरोधी हस्तक्षेप थांबवावा”

“शेतकऱ्यांवरील संकटात गप्प बसणारे भाजपाचे केंद्र व राज्य सरकार टोमॅटोला दोन रुपये मिळू लागताच शेतकऱ्यांच्या विरोधात मात्र लगेच सक्रिय झाले आहे. सरकारच्या या निर्णयाचा किसान सभा निषेध करत आहे. सरकारने आपले शेतकरीविरोधी हस्तक्षेप थांबवावेत आणि शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदत करावी,” अशी मागणी किसान सभा केली.

डॉ. अशोक ढवळे, उमेश देशमुख, चंद्रकांत घोरखाना, सुभाष चौधरी, संजय ठाकूर, डॉ. अजित नवले इत्यादींनी निवेदन जारी करत किसान सभेची भूमिका स्पष्ट केली.