जन्म – १ नोव्हेंबर १९४५
शिक्षण – एम.बी.बी.एस.
* १९८२ पासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते
* १९८९ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना. तेव्हापासून समितीचे कार्याध्यक्ष
दाभोलकरांच्या अध्यक्षतेखाली समितीची कामगिरी
* वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि मानवता यांची जोपासना
* नागरिकांचे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी सातत्याचे प्रयत्न
* धार्मिक रूढी आणि परंपरांची सर्वसमावेशक विचाराने मीमांसा
* हानीकारक रूढी आणि अंधश्रद्धांविरोधात आवाज उठवून त्या रूढींसाठी पर्याय सुचवणे
* अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आणि त्यांना कारणीभूत ठरणाऱ्या बुवा-बाबांविरुद्ध अंनिसने उभारलेल्या मोहिमा गाजल्या.
‘साधना’चे मानद संपादक
*साने गुरुजी यांनी सुरू केलेल्या ‘साधना’ या साप्ताहिकाचे १२ वर्षांहून अधिक काळ मानद संपादकपद
* ध्येयवादी पत्रकारितेचा मानबिंदू समजल्या जाणाऱ्या साधनाने नुकतीच ६५ वर्षे पूर्ण केली आहेत.
* सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक परिवर्तनाचे विषय साधनातून सातत्याने हाताळले गेले आहेत.
‘सामाजिक कृतज्ञता निधी’चे कार्यवाह
*परिवर्तनवादी चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाबद्दल मानधन देता यावे म्हणून ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ची सुरुवात करण्यात आली.
* हा निधी एक कोटी रुपयांचा आहे. या रकमेच्या व्याजातून दरमहा पन्नास कार्यकर्त्यांना एक हजार रुपयांचे मानधन दिले जाते.
* गेली अठरा वर्षे हा उपक्रम सुरू.
परिवर्तन संस्थेचे संस्थापक व कार्यवाह
* परिवर्तन ही संस्था स्थापन झाल्यापासून दाभोलकर संस्थेचे कार्यवाह होते.
* या संस्थेमार्फत व्यसनमुक्तीसाठी निवासी स्वरूपाचे कार्य मोठय़ा प्रमाणावर चालवले जाते.
* जैविक शेती, पौगंडावस्थेतील मुलामुलींचे प्रबोधन ही कार्येही संस्था करते.
राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू
* दाभोलकर राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू होते
* खेळात कार्यरत असताना बांगलादेशाविरोधातील कबड्डी कसोटी सामन्यात देशाकडून खेळण्यासाठी त्यांची निवड झाली होती.
* कबड्डीसाठी देण्यात येणारा राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती’ हा सर्वोच्च पुरस्कार तसेच ‘शिवछत्रपती युवा पुरस्कार’ही त्यांना मिळाला होता.
अंधश्रद्धाविरोधी काम करणारी अशा प्रकारची ही देशातील एकमेव संघटना आहे. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय संस्थेचे काम चालते. संघटनेच्या राज्यात १८० शाखा आहेत.
लेखन
अंधश्रद्धामागील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संधिसाधूपणा उघड करणारी दाभोलकरांची पुस्तके :
ऐसे कैसे झाले भोंदू, अंधश्रद्धा विनाशाय, अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, भ्रम आणि निरास, प्रश्न मनाचे, ठरलं डोळस व्हायचंय!, विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी, मती भानामती, श्रद्धा-अंधश्रद्धा, तिमिरातून तेजाकडे, विचार तर कराल?
डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर यांचे अल्पचरित्र
जन्म - १ नोव्हेंबर १९४५ शिक्षण - एम.बी.बी.एस. * १९८२ पासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते
आणखी वाचा
First published on: 21-08-2013 at 01:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About narendra dabholkar life