Abu Azmi : महाविकास आघाडीने आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला आहे. आज त्यांच्यापैकी कुणीही शपथ घेणार नाही. मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. कोण विरोधक? ज्यांनी आम्हाला जागा वाटपात विश्वासात घेतलं नाही, कुठल्याही गोष्टींची चर्चा केली नाही ते का? असा प्रश्न अबू आझमी यांनी विचारला आहे. तसंच त्यांनी शपथही घेतली आहे. त्यामुळे एक प्रकारे अबू आझमी ( Abu Azmi ) यांनी मविआतून बाहेर पडण्याचेच संकेत दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अबू आझमी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

सपाचे अबू आझमी हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा आणि रईस शेख हे भिवंडी मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अबू आझमी ( Abu Azmi ) यांनी महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडण्याचे संकेत दिले. तर दुसरीकडे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी कालच सोशल मीडियावरुन ठाकरे गटाच्या हिंदुत्त्ववादी भूमिकेचा विरोध केला होता. त्यामुळे आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार मविआतून बाहेर पडतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

हे पण वाचा- Abu Azmi : अबू आझमींची वाट खडतर, आजवरची सर्वात अवघड निवडणूक; मानखुर्द-शिवाजीनगरमधील राजकीय गणितं बदलली

काय म्हणाले अबू आझमी?

कोण विरोधक? त्यांनी आमच्याशी निवडणुकीच्या दरम्यान संपर्क साधला नाही. तिकिट वाटपात आमच्याशी बोलणी केली नाही. मग आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं काय? असा प्रश्न अबू आझमी यांनी विचारला आहे. ईव्हीएमबाबत जर लोकांना संशय असेल तर ते हटवलं गेलं पाहिजे. त्यासाठी जनतेच्या मागणीनुसार सगळ्यांना एकत्र येऊन याचा विरोध किंवा निषेध करायला हवा. उद्धव ठाकरे तर म्हणत होते की मी सेक्युलर झालो आहे. समाजवादी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली होती. आता विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना हिंदुत्वाच्या गोष्टी आठवल्या का? असा खोचक प्रश्न अबू आझमींनी ( Abu Azmi ) विचारला आहे. मला वाटतं की महाविकास आघाडी चालणार नाही असं झालं तर. असंही अबू आझमी ( Abu Azmi ) म्हणाले.

शिवसेनेसारख्या पक्षाबाबत सपा राहू शकत नाही-अबू आझमी

उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर काम करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले जाते. ६ डिसेंबरला बाबरी मशीद पाडणाऱ्यांचे अभिनंदन केले जाते. अशा पक्षाबरोबर समाजवादी पार्टी राहू शकत नाही. त्यामुळे मी मविआसोबत राहीन, असे वाटत नाही. समाजवादी पक्ष सेक्युलर आहे, आम्ही कम्युनल भाषा करणाऱ्या पक्षासोबत कसे राहणार? असा प्रश्न अबू आझमींनी विचारला आहे. मविआच्या सगळ्या आमदारांनी आज शपथ घेण्यास नकार देत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. मात्र, अबु आझमी यांनी मविआच्या भूमिकेशी फारकत घेत आमदारकीची शपथ घेतली. तर भिवंडीचे आमदार रईस शेख यांनीही आमदारकीची शपथ घेतली. त्यामुळे अबू आझमी ( Abu Azmi ) मविआची साथ सोडतील अशा चर्चा आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abu azmi may quits mva he takes oath as mla what did he say after it scj