शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या कुटुबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला नोटीस पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी २० मार्च रोजी चौकशी केली जाणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. याआधी तीन वेळा साळवी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, याप्रकरणाची स्वतः साळवी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. साळवी म्हणाले की, “आज सकाळी माझी पत्नी अनुजा हिला एसीबीची नोटीस आली. तसेच मोठा भाऊ दीपक साळवी आणि त्यांच्या पत्नीलादेखील नोटीस आली आहे. २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला शिवसैनिक आमदार झाला आहे. आता त्याला त्रास देण्याचं काम सुरू आहे.”

हे ही वाचा >> “विरोधकांना बोलायला जागाच ठेवली नाही”; उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

तिकडे गेले की नेते स्वच्छ होतात : साळवी

साळवी म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे आमदार आहेत त्यांना वेगवेगळ्या सरकारी संस्थांकडून नोटीसा येतात. जे लोक भाजपा किंवा शिंदे गटात गेले त्यांना नोटिसा येत नाहीत. तिकडे गेले की सर्व नेते वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतात आणि आम्हीच फक्त दोषी ठरवले जातो. केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे. सर्व केंद्रीय यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत त्यामुळे आम्हा सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acb notice to mla rajan salvi family wife anuja and deepak salvi will be interrogated asc