हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगावजवळ एक भीषण अपघात झाला. या अपघातात पाचजणांसह एकूण १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय दोन जण गंभीर जखमी आहेत. मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मालमोटारीने उभ्या असलेल्या फरशीने भरलेल्या मालमोटरीला समोरून जबर धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृतांमध्ये सलमान अली मौला अली, सत्यनारायण बळाई, लालू मीना, कदीर मेवाती, आलम आली यांचा समावेश आहे. यामधील एकजण राजस्थानमधील, तर इतर चौघे मध्य प्रदेशातील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राजस्थान येथील एक मालमोटर (एचआर-५५-एजे-३१११ ) २०० हूनअधिक मेंढ्या भरून हैदराबादकडे निघाला होता. या मालमोटर चालकासह चौघेजण केबिनमध्ये बसले होते. एक व्यक्ती पाठीमागे मेंढ्यांसोबत बसला होता. माल मोटर गुरुवारी (२५ मे) पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास माळेगाव फाट्याजवळ आली असताना उड्डाणपुलाजवळ माल मोटरचालकाला डूलकी लागली. त्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोर उभे असलेल्या मालमोटरवर त्याचे वाहन आदळले.

या अपघातामध्ये मालमोटरमधील तिघेजण जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना पुढील उपचारासाठी नांदेडला नेत असताना मध्येच मृत्यू झाला. याअपघातात १९० मेंढ्या दगावल्या. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे, जमादार दिलीप पोले, संजय राठोडसह पथकात सामील असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील दोन्ही जखमींना उपचारासाठी तात्काळ कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : Maharashtra Breaking News Live : “उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी खोटं बोलले, हा यांचा…”, सुधीर मुनगंटीवार यांचा हल्लाबोल

अपघातामध्ये जागीच ठार झालेल्या तिघांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अपघातातील एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद मेने यांचे पथक त्याच्यावर उपचार करीत आहेत. या अपघातामधील मृतांमध्ये सलमान आली मौला अली, सत्यनारायण बळाई, लालू मीना, कदीरमेवाती, आलम अली यांचा समावेश आहे. यामध्ये एक जण राजस्थानमधील असून इतर मध्य प्रदेशातील असल्याचे पोलिसांनीसांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident in hingoli many sheeps and people died on the spot pbs