सांगली : चालकाचा जीपवरील ताबा सुटल्यानंतर विद्युत खांबाला धडकून झालेल्या अपघातात दोन तरूण ठार झाले तर सहा तरूण जखमी झाले. सांगलीजवळील नांद्रे या गावी मध्यरात्री हा अपघात घडला असून या भीषण अपघातामध्ये जीपचे छत एकीकडे तर इंजिनसह  अन्य भाग एकीकडे पडला  होता.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम (फोटो सौजन्य @ Freepik)
रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
Two rickshaws collided after minor driver lost control of tempo
अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था

हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रीजवर भीषण अपघात; १४ जण जखमी

या अपघातामध्ये श्रेयस दिलीप कर्नाळे आणि अजिंक्य राजाराम चौगुले (दोघेही वय २१) या दोघांचा मृत्यू झाला. तर जीपमधील अन्य सहा जण जखमी झाले. यामध्ये ऋषिकेश यादव  (२५), साहिल मुल्ला  (२१) अनिकेत चौगुले (२०), अवधूत पाटील (२१), तेजस चौगुले (२१) आणि अन्य एकजण असे सहा जण जखमी झाले. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

खटाव (ता. पलूस) या गावातील तरूण बुधवारी मध्यरात्री गावी जीपने (एमएच  २२ बी ८२३१) सांगलीहून गावी परतत होते. मध्यरात्री दीड वाजणेच्या सुमारास नांद्रे या गावी आल्यानंतर जीप चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या लोखंडी विद्युत खांबावर आदळली. यामुळे खांबही वाकला तर जीपचे छत दुसरीकडे जाउन पडले. जीपची खांबाला धडक बसल्यानंतर दर्ग्याच्या भिंतीला धडकली. व काही अंतर फरपटत गेली.

Story img Loader