सांगली : चालकाचा जीपवरील ताबा सुटल्यानंतर विद्युत खांबाला धडकून झालेल्या अपघातात दोन तरूण ठार झाले तर सहा तरूण जखमी झाले. सांगलीजवळील नांद्रे या गावी मध्यरात्री हा अपघात घडला असून या भीषण अपघातामध्ये जीपचे छत एकीकडे तर इंजिनसह अन्य भाग एकीकडे पडला होता.
हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रीजवर भीषण अपघात; १४ जण जखमी
या अपघातामध्ये श्रेयस दिलीप कर्नाळे आणि अजिंक्य राजाराम चौगुले (दोघेही वय २१) या दोघांचा मृत्यू झाला. तर जीपमधील अन्य सहा जण जखमी झाले. यामध्ये ऋषिकेश यादव (२५), साहिल मुल्ला (२१) अनिकेत चौगुले (२०), अवधूत पाटील (२१), तेजस चौगुले (२१) आणि अन्य एकजण असे सहा जण जखमी झाले. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
खटाव (ता. पलूस) या गावातील तरूण बुधवारी मध्यरात्री गावी जीपने (एमएच २२ बी ८२३१) सांगलीहून गावी परतत होते. मध्यरात्री दीड वाजणेच्या सुमारास नांद्रे या गावी आल्यानंतर जीप चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या लोखंडी विद्युत खांबावर आदळली. यामुळे खांबही वाकला तर जीपचे छत दुसरीकडे जाउन पडले. जीपची खांबाला धडक बसल्यानंतर दर्ग्याच्या भिंतीला धडकली. व काही अंतर फरपटत गेली.