Mumbai-Pune Highway Accident: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास भीषण अपघात झाला. एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याशिवाय या बसमध्ये एकूण ४० ते ४५ जण प्रवास करत असल्याचीही माहिती मिळाली असून त्यामुळे मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांपैकी २० ते २५ जण जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) हे पुण्याला एक कार्यक्रम करण्यासाठी गेले होते. पुण्याहून परत येत असताना त्यांच्या बसला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला. शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात ही बस बाजूच्या दरीत कोसळली. पहाट ४ च्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
train accident mock drill video fact check
दोन ट्रेन समोरासमोर धडकल्या! रेल्वेचा एक डबा थेट दुसऱ्या डब्यावर चढला, अनेक प्रवासी गंभीर जखमी? अपघाताच्या घटनेचा थरारक Video? वाचा, सत्य घटना
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई

“घाट परिसर असल्यामुळे उतार खूप जास्त आहे. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालेला असण्याची शक्यता आहे. बसमध्ये एकूण ४१ प्रवासी होते. त्यातल्या २७ जणांना वाचवण्यात आलं आहे. इतरांना वर काढण्याचं काण चालू आहे. बचावकार्यात खोपोलीतील पथक, खंडाळ्यातील पथक, स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस यांनी महत्त्वाची मदत उपलब्ध करून दिली. आमच्या माहितीनुसार १३ जण दगावले आहेत”, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली आहे.

दरम्यान, घटनास्थळी वेगाने मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. मदतकार्यासाठी हायकर्स ग्रुप व आयआरबीचं पथकही हजर आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

“आम्ही खाली जाऊन बघितलं तर काहीजण मृत झाले होते. जखमींना आम्ही वर घेतलं. किमान १३ ते १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे”, अशी माहिती बचावकार्य करणाऱ्या सदस्याने पीटीआयशी बोलताना दिली.

मृतांची हाती आलेली नावे…

१) जुई दिपक सावंत, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुबई
२) यश सुभाष यादव
३) वीर कमलेश मांडवकर, वय ६ वर्ष
४) वैभवी साबळे, वय १५ वर्ष
५) स्वप्नील श्रीधर धुमाळ वय १६ वर्ष
६) सतिश श्रीधर धुमाळ, वय २५ वर्ष
७) मनीष राठोड, वय २५ वर्ष
८) कृतिक लोहित, वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई<br>९) राहुल गोठण, वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई
१०) हर्षदा परदेशी, वय १९ वर्ष, माहीम,मुंबई
११) अभय विजय साबळे, वय २० वर्ष, मालाड, मुंबई
१२) एक मयत ओळख पटलेली नाही.