चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर गाडी धडकून झालेल्या अपघातात आमदार विनायक मेटे जखमी झाले. तर गाडीचा चालकही किरकोळ जखमी झाला. बाणेर रस्त्यावरील हॉटेल ग्रीन पार्क समोर मंगळवारी पहाटे हा अपघात झाला.
मेटे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. मोटारीची एअर बॅग उघडल्यामुळे दोघांनाही मोठय़ा इजा झाल्या नाहीत.पुण्यात मंगळवारी लोकलेखा समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे मुंबईहून पुण्याला आले होते. ते आज बालेवाडी येथील क्रीडा संकुलाची पाहाणी करणार होते. त्यांची राहण्याची व्यवस्था बालेवाडी येथील हॉटेल विट्स  येथे जात असताना बाणेर रस्त्यावर फुटपाथवरील विजेच्या खांबाला त्यांची गाडी धडकली.

Story img Loader