राहाता : कोपरगाव तालुक्यातील शहापूर शिवारात मालमोटर व मोटरसायकलचा अपघात होऊन संगमनेर तालुक्यातील पती-पत्नी जागेवरच ठार झाले आहेत.ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कोपरगाव -संगमनेर रस्त्यावर घडली आहे.
कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर संगमनेरच्या दिशेने जाणारी मालमोटार (क्रमांक एच.आर.७४ बी ६२१८) हीने मोटरसायकल (क्रमांक एम.एच १५ इ.वाय.८०९८) यास पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत मोटरसायकल वरील सर्जेराव शांताराम सोनवणे(वय-४०) व रुपाली सर्जेराव सोनवणे (वय-३५ रा वेल्हाळे तालुका संगमनेर) हे दोघे पती-पत्नी जागेवरच ठार झाले.सर्जेराव सोनवणे यांच्या डोक्यावरुन मालमोटारीचे चाक गेले तर त्यांच्या पत्नी रुपाली सोनवणे यांच्या अंगावरूनही मालमोटार गेली. याबाबत शहापूरचे पोलीस पाटील भागवत खंडीझोड यांनी शिर्डी पोलीसांना देताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.मालमोटार चालक घटना घडल्यानंतर पळुन चालला होता मात्र स्थानिकांनी त्यास पकडले.
हा रस्ता अतिशय खराब आहे.खराब रस्त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात.अजुन किती बळी गेल्यानंतर या रस्त्याचे काम संबधित विभाग करणार आहे. असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.