पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळील घाटात सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान खासगी प्रवासी बस पन्नास फूट दरीत कोसळून बसचालकासह १0 जण ठार झाले असून ४0 जण जखमी झाले आहेत. तर या अपघातानंतर घाटात झालेल्या वाहतूक कोंडीदरम्यान कंटेनर एका गाडीर आदळून कारचा चेंदामेंदा झाल्याने त्यातील काही प्रवाशांचीही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त बस गुजरातची असल्याने मृत प्रवासी गुजरातचे असल्याची शक्यता आहे.
काही धाडसी लोकांनी दरीत उतरुन बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले. दरीत अंधार असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. तर बस दरीत कोसळत असतानाच पाच वाहनांचाही विचित्र अपघातात झाला. गेल्या महिन्याभरात या ठिकाणी अपघाताची ही दुसरी वेळ आहे. याआधी १४ जानेवारी रोजी झालेल्या अपघातात नऊ जण ठार झाले होते.
(संग्रहित छायाचित्र)

Story img Loader