रायगड : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाट उतरत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर खासगी बस आणि कंटेनरचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसचा चालक जागीच ठार झाला आहे. ही खाजगी आराम बस सिंधुदुर्ग जिल्ह्यात लग्नासाठी गेली होती. कोल्हापूरमार्गे वाशिंदला परतत असताना बसला कंटेनरने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
या बसमधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. चालक जागीच ठार झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अपघात झाल्यानंतर देवदूत यंत्रणा, IRB यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी, खोपोली पोलीस, घटना स्थळी मदत कार्यासाठी दाखल झाले आहेत. जखमींवर खोपोली रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
First published on: 19-12-2022 at 10:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident private bus and container on mumbai pune expressway bus driver was killed on spot raigad khopoli tmb 01