राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे हे सोमवारपासून तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहे. सोमवारी दुपारी सिंधुदुर्गमध्ये दाखल झाल्यापासून आदित्य हे वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत असून अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. मात्र याच दौऱ्यादरम्यान काल सकाळी खारेपाटण चेक पोस्टजवळ आदित्य यांच्या ताफ्यातील काही गाड्यांचा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: कुणकेश्वराचं दर्शन, लेझीम अन् बरंच काही; आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचे खास फोटो

आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफयातील मधील दोन ते तीन गाड्यांचा अपघात झाला आहे. खारेपाटण चेक पोस्टजवळ ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल मधुबनजवळ त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना हा अपघात झाला.

आदित्य ठाकरेंच्या गाडीच्या मागे असणाऱ्या गाड्यांपैकी एका गाडीने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे या गाडीमागून येणाऱ्या ताफ्यातील दोन ते तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात कोणी जखमी झाले नसून या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Story img Loader