सांगली: समोरून आलेल्या ट्रकला चुकविण्याच्या प्रयत्नात स्विप्ट मारूती मोटारीने डंपरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन महिलासह पाच जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. गुहागर-विजापूर राज्य महामार्गावर जतपासून पाच किलोमीटर अंतरावरील अमृतवाडी फाटा येथे गाणगापूर येथील दत्त दर्शन करून परतत असताना हा अपघात घडला असून एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अपघातात चालक दत्ता हरीबा चव्हाण (वय ४० रा.जत) याच्यासह नामदेव पुनाप्पा सावंत (वय ६५ ), पदमिनी नामदेव सावंत (वय ६० ), श्लोक आकाशदिप सावंत (वय ८ ) मयुरी आकाशदिप सावंत (वय ३८ सर्व रा. मुळ राहणार शेंगाव तर सध्या रा. जत) हे पाच जण ठार झाले. या पैकी चालक वगळता अन्य चौघे एकाच कुटुंबातील असुन आजी, आजोबा सून व नातू आहेत. या अपघातात वरद सावंत (वय १० ) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सांगलीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा-धक्कादायक! नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात महिलेला विंचवाचा दंश

मूळ गाव शेगाव ( ता. जत) येथील चारजण रहिवाशी आहेत. मात्र सध्या जत येथील एम आय डी सी जवळ रहात आहेत. भाडोत्री मोटार घेऊन ते देवदर्शनासाठी गेले होते. विजापूरहून ते जतकडे येत असताना अमृतवाडी फाटा येथे समोरून येणार्‍या ट्रकची धडक चुकविण्याच्या प्रयत्नात डंपरला धडक बसली. यामुळे मोटार रस्ता सोडून बाजूला पडली. या अपघातात तीनही वाहनांचे नुकसान झाले आहे.