सातारा: सुट्टीवर घरी आलेले ‘इंडो तिबेट बॉर्डर’ पोलीस दलातील जवान विजय श्रीरंग सोनावणे, विरमाडे (वय ३७, ता. वाई) यांचे आनेवाडी टोलनाक्याजवळ अपघाती निधन झाले. गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर विरमाडे येथून सातारा येथील घरी जात असताना हा अपघात झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी विष्णू माने यांची निवड

हेही वाचा – Pune City Post Office viral Video: “अख्खा ट्रक बघता बघता…”, सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्री लक्ष्य; म्हणाल्या, ‘हीच का स्मार्ट सिटी’

विजय सोनावणे हे सध्या सुट्टीवर आले होते. साताऱ्यातील तामजाईनगर परिसरात ते आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होते. मंगळवारी ते आपल्या मूळ विरमाडे गावी विसर्जन मिरवणुकीसाठी गेले होते. रात्री दुचाकीवरून सातारला परतत असताना महामार्गावर आनेवाडी टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात विजय हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.