यवतमाळमधील काँग्रेसचे आमदार नीलेश पारवेकर यांचे रविवारी रात्री एका कार अपघातात निधन झाले. दारव्हा येथून सायंकाळी ४च्या सुमारास यवतमाळकडे येत असताना लाडखेडजवळ कार उलटल्याने हा अपघात घडला. यावेळी ड्रायव्हिंग करत असलेले पारवेकर यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली, तर गाडीतील अन्य तिघे जबर जखमी झाले आहेत.
विधानसभेत पहिल्यांदाच लढून निवडून आलेले चाळीस वर्षीय नीालेश पारवेकर राहुल गांधी यांच्या युवा ब्रिगेडचे सक्रिय सदस्य होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व दोन मुली आहेत. पारवेकर हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर, पंढरीनाथ गुल्हाने आणि मोहम्मद सलीम यांच्यासह रविवारी कारने यवतमाळकडे येत असताना हा अपघात घडला. या सर्वाना येथील खासगी क्रिटिके अर या इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून रात्री साडे अकराच्या सुमारास पारवेकर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा