वाई: मी दुर्गम डोंगराळ कांदाटी खोऱ्याचाही आमदार आहे. हा भाग अनेक वर्ष विकासापासून वंचित आहे.माझ्या मतदारसंघात अनेक छोट्या मोठ्या लोकवस्तींची गावे आहेत. तेथील कार्यकर्ते नेहमीच विकासकामांसाठी पाठपुरावा करत असतात. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अशी पत्रे देत असतो. त्यातून विकासकामांचा फायदा किंवा गैरफायदा कोणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घेत असेल तर त्याची माहिती प्रशासनाने घेतली पाहिजे. जे चुकीचे असेल ते नाकारण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. त्यामुळे चुकीचे काही घडले असल्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असेही आमदार पाटील यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे. कोण राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला काय वाटते त्याच्यापेक्षा मला माझ्या मतदारसंघातील जनतेचे हित महत्त्वाचे आहे. त्यांना काय वाटते याचा विचार करण्याची मला गरज नाही. येथील सालोशीतील वळवी वस्तीवर विद्युतीकरण काम जिल्हा नियोजन आराखड्यांतर्गत उपसरंपच विठ्ठल मोरे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मंजूर केले होते. याप्रकरणी दोषी असल्यास कारवाई करावी. माझे कोणाशीही आणि कसलेही हितसंबंध गुंतलेले नाहीत. मी फक्त जनतेच्या हिताचा विचार करून कामे करत असल्यामुळे चौकशीला तयारी आहे, असे स्पष्टीकरण आमदार मकरंद पाटील यांनी दिले.महाबळेश्वर तालुक्यातील सालोशीतील वळवी वस्तीवर विद्युतीकरण काम मंजूर केले. ट्रान्सफॉर्मर बसवल्यास आजूबाजूच्या गावांचा वीज आणि पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा