Saif Ali Khan Accused Detained : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने ठाण्यातील कांदळवनातील जंगालतून अटक केली. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल न्यायालयाने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तो बांगलादेशी असल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला. मात्र, हा दावा त्याच्या वकिलांनी फेटाळून लावला आहे. सुनावणी संपल्यानंतर त्याच्या वकिलांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

मोहम्मद शेहजाद असं आरोपीचं नाव असून बईतील वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी तो बांगलादेशी असून सहा महिन्यांपूर्वी भारतात आल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. परंतु, त्याच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावला. त्याचे वकिल म्हणाले, तो बांगलादेशी असला तरीही तो सहा महिन्यांपूर्वी भारतात आलेला नाही. तो गेल्या सात वर्षांपासून भारतात राहत आहे. तसंच, त्याला कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शेहजादचे वकिल म्हणाले, नोटीस न देता सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पोलीस म्हणत आहेत की सेक्शन वाढवावे लागतील. पण कलम १०९ (हत्येचा प्रयत्न) चे सेक्शन वाढवता येणार नाही. कारण सैफला मारण्याचा त्याचा उद्देश नव्हता. किंवा जबाबातही तसं कोठे नमूद करण्यात आलेलं नाही. जे बीएनएस प्रमाणे सेक्शन लावले आहेत, ते कम्पाईंस केले नाहीत. ज्या मुद्द्यांवर आज त्याची चौकशी झाली, त्यानुसार त्याला पोलीस कोठडी देण्यात आली. साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

आरोपीचे आंतरराष्ट्रीय संबंध?

अटक करण्यात आलेला आरोपी मुळचा बांगलादेशी असल्याचं समोर येताच यात आंतरराष्ट्रीय टोळींचा काही संबंध आहे का, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, त्याचा कोणताही आंतरराष्ट्रीय संबंध नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. तो बांगलादेशी असल्याच्या कारणावरून आंतरराष्ट्रीय संंबंध जोडले जात असल्याचं म्हटलं जातंय, अशी प्रतिक्रिया त्याच्या वकिलांनी दिली.

Story img Loader