लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद दिल्यामुळे दोघा तरूणांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर कोयता व सत्तूरने सपासप वार करून प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गंभीर दखल घेत संबंधित तीन पोलीस अधिकाऱ्यांसह एका हवालदाराला सेवेतून निलंबित केले आहे.सहायक पोलीस निरीक्षक महारूद्र परजणे, फौजदार राजेंद्र मंगरूळे व महिला फौजदार सारिका गुटकूल तसेच हवालदार अरूण बजरंग माळी अशी निलंबनाची कारवाई झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>उद्धव ठाकरेंची पंतप्रधानपदाबाबत चर्चा असल्याचं विचारताच नारायण राणेंनी जोडले हात; म्हणाले…

पीडित अल्पवयीन मुलगी बार्शीत बारावी परीक्षेचा पेपर देऊन गावाकडे स्कुटी दुचाकीने परत येत होती. तेव्हा बार्शी शहरात रेल्वे फाटकाजवळ अक्षय माने व नामदेव दळवी या दोघा तरूणांनी तिला अडवून दमदाटी केली. नंतर तिच्यावर अक्षय याने लैंगिक अत्याचार केले. तर नामदेव दळवी याने साथ दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याखाली अक्षय माने व नामदेव दळवी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला होता. परंतु गुन्ह्याची नोंद केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात तत्परता न दाखविता कमालीचा हलगर्जीपणा केला. म्हणूनच मोकाट सुटलेल्या दोन्ही आरोपींनी दुसऱ्या दिवशी रात्री पीडित मुलीच्या गावी जाऊन तिच्या घरात घुसून तिच्यावर सशस्त्र हल्ला केला. यात पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आहे.