नांदेड: शाळेतून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी अश्लील प्रकार करून तिचा विनयभंग करणाऱ्या धम्मपाल राजू येरेकार याला हिमायतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथील इयत्ता दुसरीत शिकणारी अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी परतत होती. याच गावातील धम्मपाल येरेकार याने तिला रस्त्यात अडवून अश्लील प्रकार सुरु केला. घाबरलेल्या अवस्थेत तिने आरडाओरड केल्यानंतर याच शाळेत शिकणाऱ्या तिच्या बहिणीने तिकडे धाव घेतली. दोघींनीही आरडाओरडा केल्यानंतर गावातील काही लोक धावले. परंतु तोपर्यंत आरोपीने पळ काढला. घडलेला प्रकार त्या मुलीने आपल्या घरी सांगितल्यानंतर बुधवार (दि.५) रोजी रात्री धम्मपाल येरेकार याच्या विरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्याला तात्काळ अटक करण्यात आली.

उल्लेखनीय बाब म्हणजे धम्मपाल येरेकार याच्याविरुद्ध घरात घुसून विनयभंग करणे, धमकावणे, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला-पुरुषांवर दगडफेक करणे आदी गुन्हे दाखल आहेत. वारंवार अशा घटना होत असल्याने त्याच्यावर हद्दपारीची कारवाई करावी, अशी मागणी समोर आली आहे.