लातूर : संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना आरोग्य विभागाने वैद्यकीय गरजेनुसार उपचार केलेले आहेत .कोणत्याही अतिरिक्त सुविधा दिलेल्या नसल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक कराडसह आरोपींना गरज नसताना रुग्णालयात दाखल करून घेतले असे आरोप आरोग्य विभागावर करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या संबंधात आरोग्य विभागाने एक विशेष समिती स्थापन करून त्या समितीला तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आरोग्य विभागातील समितीने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून अहवाल दिला आहे. या अहवालात पोलिसांच्या निगराणीखाली आरोपीला गरजेनुसार उपचार देण्यात आले आहेत ,गरज नसताना कोणतेही उपचार दिलेले नाहीत किंवा अनावश्यक रुग्णालयात ठेवून घेतलेले नाही असे अहवालात म्हटले आहे. बीड जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अशोक थोरात हे पूर्वपरवानगीने रजेवर होते ही बाबही अहवालात नमूद करण्यात आली आहे.या अहवालामुळे आरोपीवर केले गेलेले आरोप निराधार असल्याचा दावा या अहवालात केला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused valmik karad treated by health department as per their medical needs no extra facilities provided sud 02