विधिमंडळाच्या वास्तूत पोलीस अधिकाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी तुडविण्यात पुढाकार घेणारे मनसे आमदार राम कदम यांच्यासह सर्वावर कारवाई झालीच पाहिजे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. विधिमंडळ परिसरातील मंगळवारची घटना दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
विदर्भातील दौऱ्यात जाहीर सभा आणि पत्रकार परिषदांना फाटा देणारे राज ठाकरे यांनी बुधवारी यवतमाळात येताच तब्बल तास-सव्वा तास विविध विषयांवर चौफेर संवाद साधला. डॉक्टरांनी दिलेला संपूर्ण विश्रांतीचा सल्ला बाजूला ठेवून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राज ठाकरे बुधवारी दुपारी सव्वा वाजता यवतमाळच्या शासकीय विश्राम भवनात पोहोचले तेव्हा शेकडो कार्यकत्रे आणि चाहत्यांनी त्यांना अक्षरश: गराडा घातला. या गराडय़ातून मार्ग काढत आत शिरलेल्या राज ठाकरेंनी पत्रकारांसोबत दिलखुलास गप्पा केल्या.
राज्यातील दुष्काळ हा शासनाच्या नियोजनाच्या अभावाचा आणि नाकत्रेपणाचा परिपाक आहे. हा नसíगक दुष्काळ नाही, अशी टीका करून ठाकरे म्हणाले, राज्यकर्त्यांची भूमिका विश्वस्तांची असली पाहिजे. दुर्दैवाने आजचे राज्यकर्ते स्वत:ला राज्याचे मालक समजून वागत असल्याने त्याचे दुष्परिणाम सामान्य माणसांना भोगावे लागत आहेत. शेतकरी आत्महत्येच्या बातम्या वृत्तपत्रे आणि टीव्ही प्रसार माध्यमे ज्या पद्धतीने मांडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या हाच एकमेव पर्याय असल्यासारखे वाटू लागले आहे. आत्महत्या हे आपल्या समस्यांचे समाधान नाही ही बाब शेतकऱ्यांच्या मनात आपण रुजविली पाहिजे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा