रत्नागिरी: तालुक्यातील जयगड येथे एल.ई. डी. नौकेवर शुक्रवारी रात्री उशिरा कारवाई करण्यात आली आहे. यामधे ३ तांडेलांसह लाईट, जनरेटर व इतर सामग्रीसह अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांचे  साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयगड येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जयगड समुद्रात  मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी  स्मितल कांबळे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी व स्वप्निल चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी  हे नियमित गस्त घालत होते. यावेळी  मोहम्मद हनिफ हसनमिया तांडेल, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी यांची नौका (अल-हज-हसन- नों. क्र.आयएनडी –  एमएच – ४ – एमएम – ५७०१) द्वारे जयगड समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करत असताना पकडण्यात आले. या नौकेवर नौका तांडेलसह ३ खलाशी होते. या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आले.

मासेमारी करणारी नौका जप्त करून जयगड बंदरात ठेवण्यात आली आहे. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.  ही कारवाई   स्मितल कांबळे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी व  स्वप्निल चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी व सागरी सुरक्षा पर्यवेक्षक जयगड  सुजन पवार, व सागरी सुरक्षा पर्यवेक्षक गुहागर विनायक शिंदे आणि सागरी सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने करण्यात आली.