सावंतवाडी : चहा बदलून द्या म्हणून सांगितल्यावर मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ जवळ झाराप झीरो पॉईंट येथे दोरीने बांधून पुण्याच्या पर्यटकाला जबर मारहाण करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई सुरू झाली. दरम्यान झाराप झिरो पॉईंट येथील ती टपरी आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने हटविली.

मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ झाराप झीरो पॉईंट येथे महामार्ग लगत असलेल्या हॉटेलमधील मालकासह त्याच्या कुटुंबीयांनी पर्यटकाला दोरीने बांधून मारहाण केली होती. या अमानुष मारहाणी बाबत समाजातून संतापाची लाट उसळली आहे.

Arrest for vandalizing vehicles in Kasba Peth pune news
कसबा पेठेत वाहनांची तोडफोड करणारे गजाआड; दोन अल्पवयीन ताब्यात
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Due to increasing urbanization 36th police station in nagpur is located in Garoba Maidan area
उपराजधानीत ३६ वे पोलीस ठाणे, वाढत्या शहरीकरणामुळे गरोबा मैदान परिसरात…
vasai virar latest news in marathi,
वसई : अनधिकृत इमारतीवर कारवाईच्या वेळी तणाव, शेकडो नागरिक रस्त्यावर; अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात
४१ इमारतींवरील कारवाईला वेग ,एकाच दिवसात ४ इमारती जमीनदोस्त
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
GBS , Pune, GBS affected area,
पुणे : राजाराम पूल ते खडकवासला दरम्यान जीबीएसचे बाधित क्षेत्र घोषित!
Widow practice, villages , Kolhapur,
कोल्हापुरातील दोन गावात विधवा प्रथा बंद, भेदभावाला मूठमाती देण्याचा ग्रामसभेचा निर्णय

दरम्यान याबाबत आमदार निलेश राणे सुद्धा आक्रमक झाले. त्यांनी झाराप झिरो पॉईंट येथील पर्यटकांना मारहाण केली गेलेली अनधिकृत टपरी येत्या २४ तासात काढा. अन्यथा १२ फेब्रुवारी रोजी ही टपरी मी स्वतः येऊन हटवणार असा इशारा आमदार राणे यांनी प्रशासनाला दिला होता. कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार पोलिस यंत्रणा राहील असेही त्यांनी म्हटले होते.

आमदार राणे यांनी प्रशासनाला इशारा दिल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यामधून ग्रामपंचायतीला पत्र पाठविण्यात आले. आणि त्या ठिकाणाच्या ग्रामसेवकांनी तात्काळ संबंधित मालकाला नोटीस देऊन ही टपरी काढा असे सांगितले.

दरम्यान कुडाळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी गेले, टपरी मालकाला सांगितले. त्याने ही टपरी काढायला तात्काळ सुरुवात केली. ही अनधिकृत टपरी पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ काढण्यात आली.

Story img Loader