अवैध दारू विक्री, वेळेचा अनियमितपणा व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्य़ातील ४५ बीअर बार, देशीविदेशी दारू दुकान व बीअर शॉपींवर दंडात्मक व परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक राजीव जैन यांनी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे पाठविला असून येत्या १५ दिवसात या सर्व दारू दुकानांवर कारवाईचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मुंबईनंतर राज्यात देशीविदेशी दारूची सर्वाधिक विक्री चंद्रपूर जिल्ह्य़ात होते. लोकसंख्येच्या तुलनेत येथील दारूविक्रीचे प्रमाण अधिक असण्यास तस्करी हे सर्वात मोठे कारण आहे. लगतच्या गडचिरोली व वर्धा या दोन्ही जिल्ह्य़ात संपूर्ण दारूबंदी आहे. या दोन्ही दारूबंद असलेल्या जिल्ह्य़ात याच जिल्ह्य़ातून दारूची सर्वाधिक तस्करी होते. तसे पुरावेही जिल्हा पोलिस दलाला मिळालेले आहेत. नुकतीच भामरागड येथे डॉ.मंदाकिनी आमटे यांनी जप्त केलेली दारू चंद्रपूरची असल्याचे व मूल येथून चामोर्शी येथे जाणारी दारू पोलिस दलाने जप्त केली. असे असंख्य पुरावे व बीअर बार, देशीविदेशी दारू दुकाने व बीअर  शॉपींच्या नोंदी जिल्हा पोलिस दलाने घेतलेल्या आहेत. या सर्व अवैध दारू विक्री करणाऱ्या बीअर बार, दारू दुकान व बीअर शॉपींची यादी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तयार केली आहे, तसेच जिल्हाभरातील दारू दुकान व बीअर बारच्या अनियमित वेळेच्या नोंदी, अवैध दारू विक्री व कायद्याच्या उल्लंघन केल्याच्या तक्रारींची नोंद घेऊन ४५ बीअर बार, देशीविदेशी दारू दुकाने व बीअर शॉपीचे कारवाईचा प्रस्ताव त्यांनी तयार केला. काही दिवसांपूर्वीच हा प्रस्ताव जैन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. अवैध दारू विक्रीला प्रोत्साहन देणाऱ्या या सर्व दारू दुकानांवर आता जिल्हाधिकारी कारवाईचा बडगा उगारणार आहे.
या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ४५ दुकानांच्या कारवाईचा प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती लोकसत्ताशी बोलतांना दिली. येत्या दोन दिवसात या सर्व दुकानांचा बारकाईने अभ्यास करणार आहे. ज्या दुकानाच्या गुन्ह्य़ाचे स्वरूप किरकोळ आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व ज्यांच्या गुन्ह्य़ाचे स्वरूप मोठे व अवैध दारू तस्करीला प्रोत्साहन देणारे आहे त्यांचा दारू दुकान व बीअर बारचा परवाना रद्द करणार असल्याची माहिती दिली. साधारणत: या कारवाईला पंधरा दिवस लागणार आहेत, परंतु या सर्वावर कारवाई होणार, हे निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दारू विक्रेते व बीअर बारचालक हादरले
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईच्या बडग्याने अवैध दारू विक्रेते व बीअर बारचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या अवैध व्यवसायात जिल्ह्य़ातील मोठे दुकानदान गुंतले असल्याची माहिती जिल्हा पोलिस दलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या अहवालात दिली आहे. त्यामुळे आता या मोठय़ा दारूविक्रेत्यांवर जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे. एकीकडे जिल्ह्य़ात श्रमिक एल्गारने दारूबंदी आंदोलन छेडले असतांनाही दारू विक्रेत्यांनी दारूची अवैध तस्करी, वेळेचा अनियमितपणा व कायद्याचे सर्रास उल्लंघन करणे सुरूच ठेवले आहे. त्यातच कोकणातील चार देशी दारूची दुकाने या जिल्ह्य़ात स्थलांतरित करण्याचा घाट घातला आहे. यात भरीसभर या जिल्ह्य़ातून गडचिरोलीत सर्रास दारू पाठविली जात आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी दारूविक्रेत्यांच्या विरोधात ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.