आमदारकीची स्वप्ने बघत कुंपणावर बसलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षत्याग करून भूमिका स्पष्ट करावी असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला असतानाच ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी पक्षवाढीसाठी कारवाई झालेल्या नेत्यांनाही सोबत घेण्याचा सबुरीचा मनसुबा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बठकीत दिला. याच बठकीत राष्ट्रवादीकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची खंत महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली, तर काही कार्यकर्त्यांनी विधानसभेसाठी आम्हाला गृहीत धरू नका असाही इशारा दिला.
पक्षाच्या कार्यालयात उभय मंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बठक झाली. या बठकीत दोन्हीही मंत्र्यांनी आघाडीमध्ये राष्ट्रवादीला बरोबरीचे स्थान हवे असल्याचे सांगत पक्षाची मागणी १४४ जागांची असल्याचे अग्रहक्काने सांगितले. याला काँग्रेसची तयारी नसेल तर स्वबळावर सर्व जागा लढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी असल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण विभागाची बठक बोलावण्यात आली होती. या बठकीस जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे, पक्षनिरीक्षक अशोक स्वामी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उषाताई दशवंत, लीलाताई जाधव उपस्थित होत्या.
बठकीत गृहमंत्री पाटील म्हणाले, की तळय़ात, मळय़ात अशी भूमिका काही जणांनी लोकसभेवेळी घेतली. अशांनी आपली ठाम भूमिका स्पष्ट करावी. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सर्वाधिक संधी सांगलीला मिळाली. पक्षाकडे हिशोब मागण्यापेक्षा आपण पक्षाला काय दिले याचा विचार व्हायला हवा.
त्यानंतर ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असणे स्वाभाविक असल्याचे सांगत सोशिकतेची वेळ आमच्यावर आली आहे. नाराजांनी खचून न जाता पक्षाला साथ द्यावी असे सांगून वेळ पडली तर कारवाई झालेल्या कार्यकर्त्यांना पक्ष पुन्हा संधी देतो असे सांगितले. सबुरीने घेणे हे पक्षवाढीसाठी आवश्यक असल्याचे सांगत पक्षाने जरी विलासराव जगताप यांच्यावर कारवाई केली असलीतरी सोबत घेण्याची आमची तयारी असल्याचे ते म्हणाले.
याच बठकीत पक्षांतर्गत असणाऱ्या असंतोषाला माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी वाटपावरून झालेल्या अन्यायाची वाच्यता करीत तोंड फोडले. लोकसभेला आघाडी धर्म पाळला. आता स्वबळावर लढविण्याची भाषा होत आहे. सातत्याने असेच होत राहिले तर आमची राजकीय वाटचाल काय, हे नेत्यांनी स्पष्ट करावे. अन्यथा आम्हाला राजकीय आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. आटपाडीच्या रावसाहेब पाटील यांनी याच बठकीत राष्ट्रवादीत सुद्धा एक व्यक्ती, एक पद या नियमाप्रमाणे पक्षांतर्गत कुटुंब नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगितले. कडेपूरच्या लालासाहेब यादव यांनी पक्षाच्या कार्यालयातील हे शेवटचे भाषण असल्याचे सांगून उपस्थितांना धक्का दिला तर पृथ्वीराज देशमुख यांच्या समर्थकांनीही याच पद्धतीचे सूतोवाच करीत उभय मंत्र्यांना इशारा दिला.
कुंपणावरच्या कार्यकर्त्यांनी भूमिका स्पष्ट करावी- आर. आर.
आमदारकीची स्वप्ने बघत कुंपणावर बसलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षत्याग करून भूमिका स्पष्ट करावी असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला असतानाच ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी पक्षवाढीसाठी कारवाई झालेल्या नेत्यांनाही सोबत घेण्याचा सबुरीचा मनसुबा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बठकीत दिला.
First published on: 08-07-2014 at 04:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Activists should elucidate the role r r patil