सांगली : मानव हा निसर्गाचाच एक घटक आहे. मानव जात टिकण्यासाठी निसर्गही टिकला पाहिजे. यासाठी आपण सर्वानीच पर्यावरण टिकवले पाहिजे असा धडा सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी आमणापूर (ता.पलूस) येथे दिला. चला जाणूया नदीला या उपक्रमात शिंदे यांनी कृष्णाकाठी मुला-मुलींशी गुरुवारी संवाद साधला. या अभियान अंतर्गत पदयात्रेचे ग्रामपंचायतीच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. या पदयात्रेत सिनेअभिनेते शिंदे, उद्योजक गिरीश चितळे, कृष्णा नदी समन्वयक डॉ. मनोज पाटील, पक्षी अभ्यासक संदीप नाझरे, वैभव उगळे यांचा समावेश होता. यावेळी  शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

हेही वाचा >>> “माझी ईडी चौकशी सुरू असताना शरद पवार चिंतेत होते, पण…”, रोहित पवारांचं विधान

विद्यार्थ्यांना माणूस देव आणि झाड यातील फरक विचारला. आजबाजूचा निसर्ग,  आकाशात  उडणारे पक्षी, याविषयी जाणून घेण्याची उत्सकुता  आपणास असली पाहिजे, याविषयी संवाद साधला.  तसेच निर्माल्य नदीत टाकू नका, नदी प्रदुषण बाबत पालकांना समजावून सांगा. असे मार्गदर्शन केले. नदीचे पर्यावरणीय महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी प्रगती विद्यामंदीरचे मुख्याध्यापक जीवन कांबळे, जे. आर. गावडे, जे. ए.मुल्ला, एस. एल. पाटील, समिना वांकर, वृषाली पाटील या शिक्षकांशीही संवाद साधला. यावेळी आमणापूर ग्रामपंचायतीचे  माजी सरपंच आकाराम पाटील, आदम सुतार, मोहसीन सुतार, दत्ता उतळे, अनमोल राडे, महादेव पवार यांच्या सह आमणापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदयात्रेत पेठवडगाव येथील निसर्गप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. अमोल पाटील, संदीप पाटील डॉ. नीलिमा पाटील, बाजीराव माळी आदी निसर्गप्रेमी या यात्रेत सहभागी झाले.

Story img Loader