अलिबाग : अभिनेता विकी कौशल याने किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे आज दर्शन घेतले. महाराजांच्या समाधीस्थळावर जाऊनही त्याने अभिवादन केले. शिवजयंतीचे औचित्य साधून विकी कौशल रायगडावर आला होता. यावेळी हजारोंच्या संखेने शिवभक्त आणि चाहते उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात विकी कौशलचे किल्ले रायगडवर स्वागत करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवजयंतीचे औचित्य साधून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची घोषणा त्याने कालच केली होती. त्यानुसार आज सकाळी तो पाचाड येथे दाखल झाला. रोप वे मार्गाचा वापर करून तो गडावर दाखल झाला. यावेळी राज्यसदरेवर जाऊन त्याने मेघडांबरीतील शिवपुतळ्याचे दर्शन घेतले. महाराजांना अभिवादनही केले. यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावाची टीमसुद्धा उपस्थित होती.

छावा चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलला पाहण्यासाठी हजारोंच्या संखेने शिवभक्त आणि छावा सिनेमाचे फॅन मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांच्या मानवंदनेत किल्ले रायगडावर यावेळी सलामी देण्यात आली.