पीटीआय, जम्मू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस नेते राहुल गांधी हे राजकीयदृष्टय़ा अपयशी ठरलेले नेते आहेत, त्यांची कारकीर्द सावरण्यासाठी अदानी मुद्दा जाणीवपूर्वक उकरून काढला जात आहे असा आरोप कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी केला.काँग्रेस पक्ष न्यायपालिकेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका करतानाच, विरोधी पक्षांनी राज्यघटनेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा रिरिजू यांनी दिला.


=हिंडेनबर्ग रिसर्चप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच समिती गठित केली असल्यामुळे त्याविषयी मी काही बोलणार नाही असे ते म्हणाले. काँग्रेसला नैराश्याने ग्रासलेले आहे आणि ते न्यायपालिकेवर हल्ला करत आहेत अशी टीका त्यांनी केली.