जिल्ह्य़ातील अग्रगण्य पतसंस्थेपैकी एक असणाऱ्या आदर्श नागरी पतसंस्थेने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पतसंस्थेने १ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दिला आहे.राज्यात पडलेला दुष्काळ ही सध्या चिंतेची बाब आहे. मात्र भीषण दुष्काळाचे वास्तव बघून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आता राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी अलिबागमधील पत्रकार आणि फोटोग्राफर्सनी मदतफेरी काढून ६१ हजारांचा निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिला होता. याचीच प्रेरणा घेऊन अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने आता दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. पतसंस्थेने १ लाखांचा मदतनिधी नुकताच रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आदर्शचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष काका जैन, विजय पटेल, योगेश मगर, कैलास जगे तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.  आदर्श पतसंस्थेचे काम हे नावाप्रमाणेच आदर्श असल्याचे या वेळी सुनील तटकरे यांनी म्हटले, तर संस्थेची कामगिरी ही अभिमानास्पद असून इतरांनाही प्रेरणा देणारी असल्याचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या वेळी बोलताना सांगितले.

Story img Loader